मनातले ई-पानात : इनर टु इंटरनेट -
विद्यापीठ सेवेतील स्वर्णीम 20 वर्षे

आज 6 ऑगस्ट, 2018 बरोबर आजच्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट, 1998 या दिवशी उच्च शिक्षणाचे मंदिर अर्थात विद्यापीठात पहिले पाऊल टाकले. सुरुवातीस लघुटंकलेखक पदावर नियुक्तीस सेवारत होण्यास बरोबर वीस वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने मनातले पानात उतरविण्याचा हा छोटासा प्रयत्न -
विद्यापीठात सेवा करणे मी माझे भाग्य समजतो, तत्कालिन व समकालिन कुलगुरू, कुलसचिव महोदयांबरोबर काम करतांना मिळालेला अनुभव हा भविष्यासाठी अनमोल ठेवा आहे. आज गेल्या 20 वर्षाचा मागोवा घेतल्यास काही आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्याचा संपूर्ण आढावा घेऊ शकत नाही. परंतु त्यातील काही भाग आजच्या दिवसाचे औचित्य साधून देत आहे.
नियुक्तीचा प्रथम दिवस :
सहा ऑगस्ट हा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस. खाजगी नोकरी करीत असतांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी माझे प्रयत्न होते. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच टायपीग आणि शॉर्टहॅण्ड केलेले होते. ऑगस्ट 1998 मध्ये खिश्यात तीन नोकरीच्या संधी (ऑडर्स) होत्या एकतर जिल्हा सत्र न्यायालयात (पारोळा येथे) लघुटंकलेखक म्हणून, दुसरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लघुटंकलेखक म्हणून, आणि तीसरी जळगाव जनता सहकारी बँक येथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून अजून एक संधी ठाणे कोर्टात रूजू होण्याची होती. मात्र या सर्वां मधून मी शिक्षणाची आवड असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सेवा करण्याचे ठरविले. 6 ऑगस्ट, 1998 ला सकाळी 10 वाजता महामंडळाच्या बसने विद्यापीठ गाठले. प्रशासन विभागात पाऊल ठेवल्याबरोबर समोर श्री. अरविंद बागूल सरांना विचारले आत येऊ सर, म्हटले या. नियुक्ती आदेश दाखविला. त्यांनी उपकुलसचिव एस.यु.नेवारे यांच्याकडे घेऊन गेले. तद्नंतर रवींद्र पाटील, सुरेश चव्हाण यांनी कागदपत्रे रूजू अहवाल आदि दिलेत. लोणे मॅडम, मृणालिनी चव्हाण यांनी इतर कागदपत्रे भरण्यास मदत केली. सकाळ सत्रात रूजू झालो आणि गुलाबराव बोरसे व चंद्रकांत नेरपगार यांच्या शेजारी बसलो. तेव्हा टायपिंग मशीनचे युग होते. पहिल्याच दिवशी नेवारे सरांनी एक पत्र टायपिंगला दिले. अगोदरच टायपिंग जॉबवर्क करून अनुभव कमावलेला होता तो कामी आला. अवघ्या पाच मिनीटांत पत्र समोर ठेवले. सुबक आणि सुटसूटीत टंकलेखन केलेले पत्र पाहून त्यांना आनंद झाला. परंतू चेह-यावर त्यांनी तसे जाणवू दिले नाही. तसे कडक अधिकारी म्हणून नेवारे सरांची ख्याती होती. मग गुलाबराव बोरसे, चंद्रकांत नेरपगार यांच्या माध्यमातून मला टायपिंगचे काम मिळत होते. लवकर टायपिंग करुन मी त्यांना परत करीत असे. त्याच वेळेस संगणक होते परंतु मोनोक्रॉम मॉनिटर व अक्षर नावाचे सॉफ्टवेअरच्या मदतीने वर्ड मध्ये टायपिंग करावे लागे. दोन्ही सॉफ्टवेअर बरोबर मला अजूनही जसे एमएस डॉस, लोटस 123, अल्डस पेजमेकर, विंडो 3.11, एमएस ऑफिस 97 सुध्दा येत असे. मात्र प्रशासनात केवळ अक्षर सॉफ्टवेअर मधून वर्ड मध्ये टायपिंग होत असे, मी तेही करीत होतो. एप्सॉन टॉट मेट्रीक्स् पिं्रटरवर.
लघुटंकलेखक सहकारी :
माझ्या बरोबर ऑगस्ट ते नोव्हेंबर, 1998 दरम्यान लघुटंकलेखक म्हणून रूजू झालेले झालेले सहकारी -दिपक अलाहित, रुपेश धुमाळ, गुलाब पाटील, प्रमोद चव्हाण, राजेश बगे, शर्वानी शुक्ला (मिताली देशमुख), महेश पाटील, जगदिश शिवदे, ईश्वर सामुद्रे ( गजानन साळवे, महेंद्र महाजन, रमेश गांर्गुडे हे नंतर रूजू झालेत) असे जवळपास 13 लघुटंकलेखक आम्ही त्यावेळेस 1997 च्या जाहिरातीतील होतो.
कुलसचिव कार्यालयात :
अशा पध्दतीने काही दिवस प्रशासनात टायपिंग कामे करीत असतांना साधारणत: 1999 च्या सुरुवातीस एक दिवस कुलसचिव कार्यालयातून श्री. निलवर्ण सरांचा नेवारे सरांना फोन आला की त्यांच्याकडील गव्हाळे रजेवर असल्याने एक स्टेनो पाठवा. मला नेवारे सरांनी बोलावले व म्हटले की तुम्हाला कुलसचिव साहेबांनी तातडीने बोलावले आहे. मी घाबरलो आपले काय चुकले असे स्वत:शीच बोललो. कुलसचिव कार्यालयात यापूर्वी गेलो नव्हतो. व कुलसचिव महोदयांना भेटणे तर दूरच. घाबरत घाबरत कार्यालयात प्रवेश केला. समोर एक अधिकारी होते त्यांना विचारले आत येऊ सर. त्यांनी हो म्हटले. माझे नाव विचारले. मला त्यांनी सांंगीतले की कुलसचिव महोदयांचे एक अर्जंट पत्र आहे ते तुम्ही टायपिंग कराचये आहे. (बोलण्यात गोडावा आणि चेह-यावरुन स्मित हास्य असल्याने माझा तणाव दूर झाला) बोर्डावर नाव वाचले ते ज्ञानदेव निलवर्ण सर होते. त्यांनी पत्राचे डिकटेशन दिले आणि मी लागलीच वनस्ट्रोक पत्र टाईप करुन त्यांच्या हातात ठेवले. इतक्या तत्परतेने पत्र हातात आल्यावर त्यांनी क्षणभर पत्राकडे आणि माझ्याकडे पाहिले. पत्र वाचले आणि कुलसचिव महोदयांकडे घेऊन गेले. त्यानंतर तेव्हा शिपाई पदावर असलेले बारकू पाटील यांनी मला म्हटले तुम्हाला कुलसचिवांनी मध्ये बोलावले. मी घाबरलो पत्रात काही चूकले असेल. मात्र तेथे निलवर्ण सर आणि डॉ. एस.एन.देसाई , कुलसचिव महोदय होते. देसाई सरांनी माझे नाव विचारले आणि म्हटले की, आताच निलवर्णनी तुझ्या विषयी सांगीतले आहे. उद्यापासून कुलसचिव कार्यालयात तूझी बदली झाली असेन. असे म्हणून निलवर्ण सर मला बाहेर घेऊन गेले, आणि म्हटले सरांना तुझे काम आवडले आहे. उद्या पासून रजिष्ट्रार ऑफीस मध्ये यायचे. (तेव्हा पासून निलवर्ण सरांनी माझी अशी एंट्री करुन दिली.) आणि दि. पासून मी कुलसचिव कार्यायातील पूज्य साने गुरुजी संस्कर केंद्रात रूजू झालो.
पूज्य साने गुरुजीं संस्कार केंद्रातील सेवा - मनाला स्फूर्ती देणारी :
विद्यापीठात रूजू होतांना मला नेहमी वाटे की मला कार्यालयीन काम करतांना असे काम हवे ज्यात समाजसेवा सुध्दा घडावी आणि कार्यायीन काम सुध्दा व्हावे. रूजू झाल्यानंतर थोड्याच दिवसात पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्रात देसाई सर आणि निलवर्ण सरांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची संधी मिळाली. साने गुरुजी संस्कार केंद्राचे संकल्पक आणि मार्गदर्शक श्री. मुरलीधर गंधे काका यांच्या सानिघ्यात काम करतांना भरपूर अनुभव आला. प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी काम करतांना चांगले अनुभव आले. आईतील शिक्षक आणि शिक्षकातील आई यांचा अनुबंध साध्यासाठी साने गुरुजी संस्कार केंद्राची स्थापना केली गेली.
मा.कुलसचिव महोदयांसमवेत काम करण्याची संधी :
मा. डॉ. संभाजी देसाई सर, मा. डॉ. के.बी.पाटील सर, मा. डॉ. उदय कापडीसर, मा. प्रा. एम.व्हि. बरिदे सर, मा. प्रा. डॉ. राजकिशोर गुप्ता सर, या कुलसचिव महोदयांसमवेत प्रत्यक्ष स्टेनोग्राफर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्याचे कुलसचिव महोदय श्री.बी.बी.पाटील सर यांच्या समवेत उपकुलसचिव प्रशासन म्हणून काम केलेले आहे आणि आताही कुलसचिव म्हणून त्यांच्या कामात वेगळा अनुभव मिळत आहे.
मा.कुलगुरु महोदयांसमवेत काम करण्याची संधी :
विद्यापीठात रूजू होण्यापूर्वी आदरणीय प्रथम कुलगुरु प्राचार्य एन.के. ठाकरे सर यांच्या कार्यकाळात तर मी नव्हतो, परंतु 1998 ला जसा रूजू झालो तसा त्यांच्या कार्याचा सुंंगध वेळोवेळी जाणवत होता. प्रत्येकाच्या तोंडून त्यांची शिस्त, कामाची हातोडी, प्रशासकीय वचक आदि बाबतीत एैकून भारावून गेलो होतो. त्यानंतर प्रा.डॉ. एस.एफ. पाटील सर यांच्याशी मुरलीधर गंधे काकांमुळे प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला तो सुध्दा एक महत्वाचा ठेवा आहे असे मी मानतो. त्यानंतर आलेले कुलगुरु प्रा. आर.एस.माळी सर यांच्या शी सुध्दा कुलसचिव कार्यालयात स्टेनो म्हणून कार्यरत असतांना संपर्क आला. त्यांच्याकडूनही बराच शिकलो. नंतर आलेले कुलगु डिग्री अण्णासाहेब प्राचार्य के.बी.पाटील सर यांच्या कार्यकाळत तर प्रत्यक्ष कुलगु डिग्री कार्यालयात हजर होतो. त्यांच्या समवेतही काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी प्रत्येक बाबतीत मला दिलेले प्रोत्साहन आयुष्यात विस डिग्री शकत नाही. त्यांच्या काळातच (सन 2011) मध्ये मी पदव्यूत्तर पदवी एमसीजे मध्ये सुवर्णपदक, पीएच्.डी. युजीसी नेट (दिल्ली) आणि सेट (पुणे) अशी शैक्षणिक कारर्किद पूर्ण करु शकलो. त्यानंतर आलेले प्रा.सुधीर मेश्राम सर यांच्यासोबतही राहून मी बरेच शिकलो. आणि विद्यमान कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील सरांसमवेत काही काळ काम करता आले त्या काळात त्यांच्यातील वक्तशिरपणा मला मनाला भावला.
याप्रमाणे कुलसचिव आणि कुलगुरुमहोदयांसमवेत काम करतांना जो अनुभव पाठीशी आहे तो अनमोल ठेवा म्हणून यापुढील आयुष्यात कायम राहील.
आठवणीचां ठेवा भरपूर आहे. पुन्हा कधीतरी सांगेन..... तूर्त इतकेच.....
क्रमश:

No comments:
Post a Comment